Satara | वाईत तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

वाई, (प्रतिनिधी) – वाई खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोमवारी (दि. ७) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते वाई येथे करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा व त्यानिमित्त जाहीर सभा दुपारी १ वाजता येथील द्रविड हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वाई येथील कृष्णा नदीवरील पूल ( १५ कोटी) धोम धरण भिंतीखालील व्याहळी कॉलनी- धोम पूल (८. ५०), आणि रस्ता (२ कोटी), वाई नगरपालिका शाळा (क्र.१) इमारत (४.५० कोटी), कृष्णा नदी तीरावरील ७ घाटांवरील हेरिटेज वॉक प्रकल्प(२.९७ कोटी) व नाना- नानी पार्क (१ कोटी ५ लाख)आदी कामांचे भूमिपूजन उद्या करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रतापगड फाटा ते सुरूर(२९३ कोटी), वाई शहरासाठी धोम धरणातून नळ पाणीपुरवठा योजना (५८ कोटी ७२ लाख) शहर सांडपाणी प्रक्रिया योजना-एसटीपी प्लॅंट (२२ कोटी ९१ लाख) एकसर- वाई रस्ता (४.५० कोटी),
भुईंज कारखाना ते राऊतवाडी रस्ता ३ कोटी), रायरेश्वर फाटा ते खावली घाट रस्ता (५ कोटी) भूसंपादनासह महाबळेश्वर बाह्यवळण रस्ता (२५ कोटी), महाबळेश्वर पोलीस ठाणे इमारत (२.०७ कोटी), महाबळेश्वर प्रशासकीय इमारत (१७.६७ कोटी )या कामांचे भूमिपूजन होणार आहे.
खंडाळा तालुक्यातील भोर- लोणंद मार्गावरील अहिरे गावातील रस्ता (६ कोटी), बावडा येथे पूल बांधकाम (५ कोटी), खंडाळा- धावडवाडी फाटा रस्ता (२० कोटी) कामांचे,रस्त्यांचे भूमिपूजन दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमास व सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन दत्तानाना ढमाळ, प्रमोद शिंदे, बाबूराव संकपाळ, संजय लोळे, अनिल सावंत यांनी केले आहे.





