पिंपरी | आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती वाचनालयाचे उद्घाटन

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पिंपळे गुरव कला, क्रीडा, संस्कार, संस्कृती समितीच्या माध्यमातून मुख्य बस स्थानकावर आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
वाचनालय फलकाचे अनावरण पीएमपीएमएलचे पिंपरी आगार प्रमुख भास्कर दहातोंडे यांनी फीत कापून केले. डॉ. धीरज जंगले उपस्थित होते.सुनीता कोळप व माधवी मुळूक यांनी स्वागत केले. समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी प्रास्ताविक केले. समितीचे हे तिसरे वाचनालय असून चौथेही वाचनालय लवकरच सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.
उद्घाटक दहातोंडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत वर्तमानपत्र वाचनालयासोबतच प्रवाशांसाठी विविध मार्गावरील बसचे वेळापत्रक, वारंवारीता आणि पासेसची माहिती दिल्याबद्दल प्रवासी मार्गदर्शन आणि रोजच्या घडामोडी जाणून ज्ञानातही भर पडेल असे सांगितले.
कार्यक्रमास कोयापुनेमगोंड संघटनेचे अध्यक्ष माधव मडावी, अजय अत्राम, पंढरीनाथ वरखडे, पीएमपीएमएल आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक विरणक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या प्रतीक्षा जोशी, आदिम महिला महासंघाच्या ललिता वाजे, सह्याद्री संस्थेचे गोविंद पोटे, पीसीएमसी स्वच्छता विभागाचे पर्यवेक्षक प्रणय चव्हाण, स्वराज कांबळे, सागर पाटील, सुनंदा तामचीकर, शिवसह्याद्री ढोल पथकाचे अभिजित पवार, विशाल जगधने, वैष्णवी कराळे, विजय जोशी उपस्थित होते.





