महाराजगंज – उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये 14 वर्षीय मुलगी बेपत्त झाल्याची घटना समोर आली आहे. 8वी मध्ये असलेली ही मुलगी गेल्या तासापूर्वी बेपत्ता झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. या मुलीचा शोध घेत असताना पोलिसांनी तिच्या फोन कॉल्सचे डिटेल्स तपासले असता पोलिसांना धक्काच बसला. तपसादरम्यान बेपत्ता झालेल्या या मुलीने तब्बल 36 मुलांसोबत रात्री उशीरापर्यंत चॅटिंग केले त्यानंतर या सर्वांना तिने ब्लॉक केले होते. चॅटिंग केलेल्यापैकी एकाने या मुलीला आमीष दाखवून पळवून नेने मात्र त्यातील नेमका मुलगा कोण याचा शोध पोलिसांना अद्याप लागला नाही.
ही अल्पवयीनमुलगी वार्षिक परीक्षा देण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली आणि पुन्हा घरी परतलीच नाही. त्यानंतर कुटुंबाने शाळेशी संपर्क केला तेव्हा ती मुलगी शाळेत परीक्षा देण्यासाठी आलीच नाही असे सांगण्यात आले. दरम्यान कुटंबियांनी कोतवाली पोलीस पोलिसात धाव घेतली व मुगली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली.
पोलिसांनी या मुलीचा शोध घेणास सुरुवात केली असून बेपत्ता मुलीच्या शाळेतील सहकारी मैत्रिणींची चौकशी करत आहे. ही विद्यार्थिनीशी कोणत्या मुलासोबत जवळीक होती आणि तिच्या ग्रुपमध्ये कोणाचा समावेश आहे हे पोलीस शोधत आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी व्हॉट्सअप चॅटच्या आधारे मुलीच्या एका मित्राला बोलावून चौकशी केली तेव्हा मुलीचे अन्य मुलांसोबतचे चॅट पाहून तोदेखील रडायला लागला. सीडीआर रिपोर्टनुसार, 36 नंबर असे होते ज्यांच्याशी मुलगी रात्री 2-2 वाजेपर्यंत बोलत होती. त्यानंतर तिने हे सगळे नंबर ब्लॉक केले. अलीकडेच तिने ज्या नंबरवर संवाद साधला त्या मुलांशी पोलीस चौकशी करत आहे.
यावेळी पोलिस तपास करत असताना एका मुलाने बेपत्ता मुलगी त्याला खूप आवडायची असेही सांगितले. त्याने बऱ्याचदा तिला आर्थिक मदतही केली आहे. परंतु ती इतक्या मुलांशी बोलतेय हे मला माहिती नव्हतं. ही गोष्ट त्याला समजताच तो रडायला लागला. पुढिल तपास पोलिस करत आहेत.