हिवाळ्यात कॉफीमुळे मिळेल सुंदर आणि निरोगी त्वचा

कॉफी तुमची त्वचा आणि केसांसाठी एका जादूपेक्षा नक्कीच कमी नाही. कारण या दोन्ही गोष्टींना कॉफी योग्य पोषण देते. तुम्हाला नेहमी सुंदर आणि निरोगी दिसायचं असेल तर कॉफी तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. कशाप्रकारे ते आपण जाणून घेऊया.

कॉफी स्क्रब
कॉफीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुमची त्वचा तरूण दिसण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या सुंदर चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी स्क्रब म्हणून तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. जेणेकरून तुमच्या त्वचेवरील पोअर्स साफ होण्यास मदत होते.
तसेच कॉफी तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. बॅक्टेरिया आणि फंगस आपल्या चेहऱ्यापासून लांब ठेवण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्याचं रक्षण करण्यासाठी याचा उपयोग होते.
स्क्रब कसे बनवाल
कॉफी पावडरमध्ये पाण्याचे काही थेंब घाला ,व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करा.ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिट्सने चेहरा थंड पाण्याने धुवा.
कॉफी फेसपॅक
नेहमी चमकदार आणि तरूण त्वचा हवी असल्यास, तुम्ही कॉफी फेसपॅकचा वापर नक्की करावा. त्यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाऊन फेशियल अथवा बॉडी स्क्रब करून घ्यायची गरज भासणार नाही.

कॉफीला तुम्ही तुमचं ब्युटी घटक बनवल्यानंतर तुम्ही घरच्याघरी ही गोष्ट करू शकता. यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे बॅक्टेरिया दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. डेड स्किन सेल्सवर कॉफी चांगलं काम करते. तर कॉफी टॅन झालेली त्वचा उजळवण्याचंही काम करते. तुमचे पोअर्स टाईट करण्यासाठीही कॉफीचा उपयोग होतो.
फेसपॅक कसे बनवाल
एक वाटी दह्यामध्ये कॉफी पावडर आणि थोडंसं पाणी मिसळा ही तयार झालेली घट्ट ब्राऊन पेस्ट चेहऱ्यावर लावा साधारण 10-15 मिनिट्सने चेहऱ्यावर पेस्ट सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा.





