पाच जनावरांची कामशेत पोलिसांनी केली सुटका
कामशेत – नाणे गावामध्ये गोवंश कायद्याचे उल्लंघन करत गोवंश घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून त्यातील पाच जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी रुपेश हनुमंत गराडे (वय 31, वर्षे रा. धामणे ता. मावळ जि. पुणे) याने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रुपेश गराडे यांच्या फिर्यादीनुसार शब्बीर अजीज सय्यद (वय 32, रा. केवरे, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) आणि नदीम जाफर कुरेशी (वय 31, रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणे गाव हद्दीत सोमवारी (दि. 20) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका खासगी टेम्पोमध्ये (एम. एच. 14 सी. पी. 7480) शब्बीर अजीज सय्यद व नदीम जाफर कुरेशी हे गोवंशची पाच जनावरे स्वतःचे फायद्याकरिता बेकायदेशीर रित्या कत्तल करून मांस विक्री करण्याचे उद्देशाने बांधून ठेवली. तसेच त्यांची वाहतूक करताना आढळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक आर. जे. कानगुडे तपास करीत आहेत.