राज्यात बारावीच्या परीक्षेत 768 कॉपीची प्रकरणे आढळली

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्याकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यात तब्बल 768 कॉपीची प्रकरणे आढळली आहेत. यात सर्वाधिक प्रकरणे औरंगाबादमध्ये सापडली आहेत.

कॉपीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्यात विभागनिहाय एकूण 256 भरारी पथके नेमण्यात आली होती. पुणे विभागात 39, नागपूरमध्ये 71, औरंगाबादमध्ये 373, मुंबईमध्ये 28, कोल्हापूरात 33, अमरावतीत 76, नाशिकमध्ये 120, लातूरमध्ये 25, कोकणात 3 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. तोतयेगिरीचे पुण्यात एक व औरंगाबादमध्ये एक अशी एकूण दोन प्रकरणे घडली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.