लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव उत्साहात संपन्न

Updated On:

पुसेगाव (प्रकाश राजेघाटगे)- राज्यात आणि उत्तर कर्नाटकामध्ये प्रसिध्द असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी ७५ व्या स्मृतिदिनानिमित्त रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते. आज सकाळी दहा वाजता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते रथपूजन झाले.

या रथपूजन सोहळ्यास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोषजाधव, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, वर्धनचे चेअरमन धैर्यशिल कदम, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार किरण जमदाडे, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य, देवस्थानचे माजी चेअरमन व माजी विश्वस्त, माजी जि.प. सदस्य मानाजी घाडगे, किरण बर्गे, बुधचे सरपंच  अभयसिह राजेघाटगे, अर्जुन मोहिते, युवा नेते अमित जगताप, महेंद्र नलवडे, लवकुमार मदने व पुसेगावचे ग्रामस्थ भाविक, यात्रेकरु उपस्थित होते.

गुरुवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधिवत पूजा व अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुका व प्रतिमांची मठाधिपती सुंदरगिरी महाराज, संतोष जाधव व सर्व विश्वस्तांमार्फत रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र पदेश आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनामुळे पहाटे पासूनच पुसेगाव नगरी फुलून गेली होती. सकाळी अकरानंतर भाविकांचा रथ व समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता. रथपूजनानंतर रथ गावातून प्रदिक्षणेसाठी मंदिराबाहेर निघाला व त्यानंतर रथाच्या सवाद्य मिरवणूकीस मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.

मिरवणुकीच्या अग्रभागी लेझीम व बॅड पथके होती. लाखो भाविकांनी १ रूपयापासून १o हजार रूपयापर्यंत नोटांचे हार मोठया भक्तिभावाने व श्रध्देने रथावर बांधले. यावेळी श्री. सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पेढे, मिठाई व गुलालाची उधळण करण्यात आली. नोटांच्या वर्षावात निघालेली ही मिरवणूक सगळयांचे लक्ष वेधून घेत होती.

रथ दर्शनानंतर भाविकांची पावले यात्रा स्थळाकडे व श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाकडे वळत होती. त्यामुळे यात्रास्थळही गजबजून गेले होते. रथोत्सवादिवशी आलेल्या सर्व भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात येत होता. यात्रेनिमित्त यात्रास्थळावर स्टेशनरी, सौदर्यप्रसाधने, पाळणे, मिठाई, हॉटेल, स्वेटर, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. अनुचित प्रकार घडू नयेत व यात्रा शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे यात्रेकरुंना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Electricity Wire Theft: महावितरणचे 'विद्युततारा' चोरणारी टोळी गजाआड; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

2026-07-07 00:15:54

Electricity Wire Theft: महावितरणचे 'विद्युततारा' चोरणारी टोळी गजाआड; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Crime : पुसेगावात गॅस कटरने एटीएम फोडून 6.61 लाखांची रोकड लंपास

2026-06-19 17:17:51

Crime : पुसेगावात गॅस कटरने एटीएम फोडून 6.61 लाखांची रोकड लंपास

Satara News : पूर्ववैमनस्यातून झालेल्या थरारक खुनाचा पुसेगाव पोलिसांकडून छडा; मुख्य आरोपींना अटक

2026-06-10 21:02:46

Satara News : पूर्ववैमनस्यातून झालेल्या थरारक खुनाचा पुसेगाव पोलिसांकडून छडा; मुख्य आरोपींना अटक

Pusegaon Bakri Eid : पुसेगावात मुस्लिम बांधवांनी नाकारली 'कुर्बानी'; कारण वाचून तुम्हीही कराल सॅल्यूट

2026-05-30 00:15:52

Pusegaon Bakri Eid : पुसेगावात मुस्लिम बांधवांनी नाकारली 'कुर्बानी'; कारण वाचून तुम्हीही कराल सॅल्यूट

Satara News : पोलिसांना उघड आव्हान! खटाव तालुक्यात दीड महिन्यात 8 वेळा वीज तारांची चोरी; 79 हजार फूट तारा लंपास

2026-05-26 17:01:46

Satara News : पोलिसांना उघड आव्हान! खटाव तालुक्यात दीड महिन्यात 8 वेळा वीज तारांची चोरी; 79 हजार फूट तारा लंपास