मोदींच्या राज्यात संशयित आधी दोषी ठरवला जातो नंतर त्याची चौकशी होते – चिदंबरम

नवी दिल्ली – मोदींच्या राज्यात संशयीत आधी दोषी ठरवला जातो आणि नंतर त्याची चौकशी सुरू केली जाते. आणि तो जो पर्यंत निर्दोष ठरत नाहीं तो पर्यंत तो दोषीच समजला जातो अशी उरफाटी पद्धत मोदींनी आपल्या राजवटीत पाडली आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केली आहे.

केंद्रीय विधी सचिवांनी मोदींना कायद्या विषयीचे किमान मुलभूत ज्ञान द्यावे, जामीन हा कायदेशीर आधिकार आहे आणि जेल हा अपवाद आहे असे सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केले आहे हे त्यांना एकदा समजाऊन सांगितले पाहिजे असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. मोदींनी सध्या प्रचार सभांमधून विरोधकांवर जे हल्ले चढवले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ही टीका केली आहे.

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना मोदींनी हे जाहींरनामा पत्र जामीनावर बाहेर असलेल्या व्यक्तीकडून करण्यात आल्याची टीका चिदंबरम यांचे नाव न घेता केली होती त्यावर चिदंबरम यांनी हा पलटवार केला असल्याचे मानले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.