गेल्या दहा वर्षात महिलांचा रागीटपणा वाढला… भारतीय महिलांच्या रागीटपणात दुपटीने वाढ

वॉशिंग्टन – आधुनिक काळामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारच्या सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध होत असल्या तरी त्या सुविधांची दुसरी बाजू म्हणजे मानसिक तणाव ही समोर येत आहे एका ताज्या संशोधनाप्रमाणे गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर महिलांच्या रागीटपणामध्ये वाढ झाली आहे.
भारतीय महिलांचा विचार करता जगातील इतर महिलांच्या तुलनेत भारतीय महिलांचा रागीटपणा तब्बल दुप्पट वाढला आहे 10 वर्षापूर्वी महिला आणि पुरुष यांच्यातील रागीटपणाचे प्रमाण पाहिले तर महिलांपेक्षा पुरुष जास्त रागीट होते पण गेल्या दहा वर्षांमध्ये हे प्रमाण वाढले आहे. पुरुषांपेक्षा महिला सहा टक्के जास्त रागीट झाल्या आहेत भारतीय महिलांचा विचार करता हे प्रमाण 12% आहे म्हणजे जगातील इतर महिलांच्या तुलनेने भारतीय महिलांचा रागीटपणा दुप्पट प्रमाणात वाढला आहे.
गॅलप वर्ल्ड या संस्थेने 2011 ते 2021 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील 150 देशांमधील बारा लाख लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष जाहीर केला आहे करोना महामारीच्या कालावधीमध्ये रागीटपणाची ही पातळी अधिकच वाढल्याचे लक्षात आले भारत आणि पाकिस्तानमधील महिलांमध्ये हे प्रमाण जास्तच आहे मानसोपचार तज्ञ डॉक्टर लक्ष्मी विजय कुमार यांनी दिलेला माहितीप्रमाणे महिला आता स्वावलंबी असल्याने स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात त्यामुळे त्यांच्या कोणत्या निर्णयाला पुरुषांनी विरोध केला तर त्यांचा रागीटपणा वाढतो महिला बाहेरच्या जगात जरी स्वावलंबी असल्या तरी घरात मात्र पितृसत्ताक पद्धती अद्यापही अस्तित्वात असल्याने हा असमतोल सहन करणे त्यांच्यासाठी अवघड जात आहे त्यातूनच रागीटपणा वाढत चालला आहे शिक्षणाचा प्रसारही वाढल्याने महिलांच्या अपेक्षाही वाढत चालल्या आहेत शिक्षणाच्या तुलनेत जर अपेक्षित वेतनाची नोकरी मिळाली नाही ते सुद्धा एक राग वाढण्याचे कारण मानले जात आहे





