सासवड -जैन धर्माचा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा चातुर्मासातील पर्युषण पर्व शनिवार (दि. 15) ते शनिवार (दि. 22) या कालावधीमध्ये सासवड (ता. पुरंदर) येथील कुंथुनाथ भगवान जैन मंदिरात उत्साहात पार पडले.
या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्याने व मंदिर बंद असल्यामुळे कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आला. मंदिरामध्ये फक्त पूजा व आकर्षक सजावटी ही साध्या पद्धतीने पुजारी धनराज शर्मा यांनी केली होती. जैन समाजातील श्रावक बंधू यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी भगवान महावीर जन्माचे वाचनाचा कार्यक्रम करण्यात आला. व त्याचबरोबर पाळणा रमेश ओसवाल यांनी घेतला. अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला होता, असे जैन संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
दिगंबर जैनांचे दशलक्ष पर्व भाद्रपद शुक्र पक्ष पंचमी ते पौर्णिमेपर्यंत चालते बाबरजी मंदिरात फक्त अभिषेक व पूजा करण्यात येईल, असे पुजारी वैभव खलसे यांनी सांगितले. यावेळी बाबुशेठ सोळंकी, महेंद्र ओसवाल, रमेश सोळंकी, मुन्नाशेठ सोळंकी, कपिल, सोळंकी, प्रथम पोरवाल, हेमंत कोठारी
उपस्थित होते.