“ब्रेक्‍झिट’मध्ये वातावरण बदलाला डावलल्याने ब्रिटिश संसदेत अर्धनग्न निदर्शने

लंडन – ब्रिटनच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सोमवारी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन जोरदाऱ् निदर्शने केली. “ब्रेक्‍झिट’दरम्यान वातावरण बदलाच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही निदर्शने करण्यात आली. अशाप्रकारे निदर्शने केल्याचा प्रकार ब्रिटिश संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला.

एक्‍सलंट रेबेलियन ग्रुपच्या 11 कार्यकर्त्यांनी संसदेच्या पब्लिक गॅलरीत 20 मिनिटे विरोध दर्शवला. गॅलरीच्या काचेच्या भिंतीजवळ हे लोक उभे होते. कार्यकर्ते ब्रेक्‍झिटवर चर्चा करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे पाठमोरे होऊन उभे होते. त्यांच्या अंगावर “सर्वकाही जीवनासाठी’ असे घोषवाक्‍य होते. सार्वजनिक ठिकाणी परंपरेचा भंग केल्याच्या आरोपाखाली या कार्यकर्त्यांना अटक केली.

ब्रिटनची संसद 1807 मध्ये अस्तित्वात आली. जगातील अनेक लोकशाही असलेल्या देशांसाठी ब्रिटन आदर्श मानले जाते. म्हणूनच “मदर ऑफ पार्लमेंट’ असे संसदेचे वर्णन केले जाते. तेंव्हापासून संसदेची प्रतिष्ठा मोलाची मानली जाते. जुलै 1978 मध्ये माल्टाचे माजी पंतप्रधान डोम मिंटॉफ यांच्या कन्या यानाने स्कॉटिश होम रुलवरून चर्चेदरम्यान गॅलरीतून लोकप्रतिनिधीवर घोड्याची लीद फेकली होती. छोट्या पिशव्यांतून ती फेकली होती. त्यामुळे बाकांवर घाण झाली.

एमआय-5 च्या (ब्रिटनची गुप्तचर संस्था) सुरक्षेचा आढावा घेणारे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यावर फादर्स ऑफ जस्टिसच्या निदर्शकांनी जांभळ्या रंगाचे पीठ फेकले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.