पिंपरी | तळेगावमध्ये मुलींनी मारली बाजी

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव शहरातील बहुतांशी शाळांचा निकाला समाधानकारक लागला आहे. दहावीच्या या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. कृष्णाराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यामध्ये वर्धायनी डाळींबकर (९४.२०) नेहा मराठे (९३.४०), हिंदवी ढोरे (९३.२०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावला आहे. अँड पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेचा ९६.०० टक्के निकाल लागला असून यामध्ये शुभम संताजी माळी (९५.०८), सोजल श्रीकांत जठार (९३.०२), आदिती भारत पवार (९१.०८) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावला आहे.
रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये सत्यशील अनंत नाईक (९८) प्रणाली प्रकाश म्हस्के (९४.२०) श्रेयश दिलीप दळवी (९३.४०), सायली बाळकृष्ण घाणे (९३.४०) हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
डॉ. आण्णासाहेब चोभे हायस्कूलचा (बालविकास विद्यालय) १०० टक्के लागला असून यामध्ये ऋतुजा रुपेश गोडसे (९८.६०) अनुष्का रामचंद्र जाधव (९६) आणि मल्हार केदार देशपांडे (९४.६०) टक्के गुण मिळविले आहेत.
सरस्वती विद्या मंदिराचा निकाला १०० टक्के लागला असून यामध्ये प्रथम विश्वजित विष्णू गावडे (९७.६०), द्वितीय श्रद्धा मुकुंद इंगळे (९६.८०), समीक्षा शरद क्षीरसागर (९६) टक्के गुण मिळवत तृतिय क्रमांक मिळविला आहे.
तसेच नगर परिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक सहाचा निकाल ८९.१८ टक्के लागला असून गोविंद परमेश्वर शिंदे (८६.६०), शरंण्या रवींद्र केंगार (८३.२०) शिवानी रोहिदास भालेराव (८२.८०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावला आहे.
नवीन समर्थ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये शुभम अरुण हरिचंद्र (९२.४०) निखील धर्मेंद्र गिरी (९१.६०) ईंश्वरी हरिभाऊ रासकर (९१.४०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावला आहे. स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलचाही १०० टक्के लागला आहे.
यामध्ये अमृता बाळासाहेब जाधव (९६.२०), आदर्श रामसिंग वर्मा (९३.६०), अक्षद राजेंद्रकुमार राठोड (९१.८०) गुण मिळवित शाळेत प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांकाने बाजी मारली आहे.
नगर परिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक दोनचा निकाला ९८.४१ टक्के लागला असून यामध्ये प्रणव नामदेव तरटे (८२.४०), स्नेहल मारुती गोरे (७९.४०), करिष्मा सलील शेख ७७.०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सह्याद्री इंग्लिश स्कूलचा निकाला १०० टक्के लागला असून जान्हवी संजय शेलार (९२.५०), दुर्गा रमेश यादव (८९.६०) श्रीराज संतोष सावळे (८७.८०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावला आहे.
बहुतांश मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळांनी १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील शालेय अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच नगर परिषदेच्या शाळेतील मुख्याधिकारी, प्रशासन अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून भविष्य काळातील शैक्षणिक वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





