मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ईडीने ईसीआयआर नोंदवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस म्हणाले, सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगच्या बाबत ईडीने एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) नोंदवावा.
दरम्यान, फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली. हा खटला सीबीआयकडे सोपविण्याविषयी एक प्रचंड जनभावना आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास नाखूष आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात लोकांमध्ये मोठी भावना आहे. या प्रकरणात काहीतरी लपवून ठेवले जात आहे, नवीन खुलासे केले जात आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील लोक करत आहेत. भाजप नाही, परंतु राज्य सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी नाकारत असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणात मनी लाँडरिंग झाल्याचे समोर आले आहे. असे दिसून आले आहे की सुशांतच्या खात्यातून तब्बल १५ कोटींची रक्कम गायब झाली. अशा परिस्थितीत हे प्रकरण ईडीचा अधिकारक्षेत्रात आहे, त्यामुळे मी ईडीकडे ईसीआयआर नोंदवून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सर्व बाजू तपासल्या जातील, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, सीबीआय चौकशीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहेत.
सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला फसवल्याचा आरोप झाला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर बिहार पोलीस तपासासाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे.
सुशांतसिंह यानं १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. हिंदी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतनं हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. मात्र ही ‘आत्महत्या’ नसून ‘हत्या’ असल्याचे बोलले जात आहे. राजकीय पातळीवर देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येत आहे.
There is a huge public sentiment about handing over #SushantSinghRajput case to CBI but looking at the reluctance of State Government, atleast @dir_ed ED can register an ECIR since misappropriation and money laundering angle has come out.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2020
हे सुद्धा वाचा…
आत्महत्या नव्हे ही तर हत्या – सुशांतच्या मामांचा खळबळजनक आरोप