सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 47 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले असून, 291 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 24, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 29, कोरेगाव 13, वाई 87, खंडाळा दोन, रायगाव व म्हसवड प्रत्येकी तीन, पानमळेवाडी 63, महाबळेश्वर दहा, पिंपोडे सहा व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 51, असे एकूण 291 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. करोनाची सद्य स्थिती : एकूण नमुने – 324310 एकूण बाधित – 57207 घरी सोडण्यात आलेले – 54563 मृत्यू – 1833 उपचारार्थ रुग्ण – 811