ग्रामीण भागात अधिक, तर शहरी भागात कमी

विधानसभा मतदारसंघानुसार मतदानाची टक्केवारी पाहिली तर मतदारसंख्येनुसार सर्वात लहान समजल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्‍केवारी अधिक आहे. सर्वाधिक मतदान हे कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये 67.76 टक्के नोंदवले गेले. त्यापाठोपाठ, उरण विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आहे. उरणमध्ये 2 नाख 90 हजार 273 मतदारांपैकी 1 लाख 95 हजार 101 मतदारांनी मतदान केले. म्हणजेच 67.21 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 62.60 टक्के इतके मतदान झाले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात 56.29 टक्के, पनवेमध्ये 55.33 टक्के, व सर्वात कमी मतदान पिंपरी विधानसभा मतदारसंघात 50.74 टक्के एवढे झाले आहे. सर्वाधिक मतदार पनवेल आणि चिंचवड विधानसभा या मतदार संघात आहेत. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघात ज्या उमेदवाराला मताधिक्‍य जास्त मिळेल, त्यावरच मावळचा निकाल अवलंबून असल्याचे सध्या तरी राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे. परंतु गेल्या निवडणुकीतील आकडे पाहता शेकापचा गढ मानल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेले अधिक मतदान गणित बदलू शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.