राजगुरुनगर- राक्षेवाडी (ता. खेड) येथे अज्ञात कारणावरून एकाला तलवारीने भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री घडली. यामध्ये दत्तात्रय विठ्ठल राक्षे (वय 45) हा गंभीर जखमी झाला आहे. तर हल्लेखोर संजय तबाजी राक्षे (रा. राक्षेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला होता. त्या रागात संजय याने घरात अडगळीत पडलेली तलवार काढून दत्तात्रय याच्या पोटात खुपसली. तलवार पोटातून आरपार गेल्याने दत्तात्रय राक्षे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.