पुणे – पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता फक्त तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज नेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 138 अर्ज नेले आहेत तर 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बारामती मतदारसंघासाठी 51 उमेदवारांनी अर्ज नेले असून 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि.28 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांना दि.4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उद्यापासून (दि.2) प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज भरणार आहे.