प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 -मार्केट यार्डात मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर आहे. तरीही मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने हिरवी मिरची, फ्लॉवर आणि गवारच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, सिमला मिरची आणि वांग्याच्या भावात मात्र घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, मागच्या काही महिन्यांत पावसामुळे फळभाज्या पिकांना फटका बसला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली होती. आता हळूहळू हे भाव उतरत असल्याचे सांगितले जात आहे. येथील बाजरात रविवारी (दि. 28) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरव्या मिरचीची 8 ते 10 ट्रक, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 टेम्पो घेवडा, इंदौर येथून 9 ते 10 टेम्पो गाजर, मध्य प्रदेश येथून लसणाची 13 ते 14 ट्रक इतकी आवक झाली. तर राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची 1200 ते 1300 पोती, भेंडीची 5 ते 6 टेम्पो, गवारची 5 ते 6 टेम्पो, टोमॅटोची 9 ते 10 हजार पेटी, फ्लॉवरची 8 ते 10 टेम्पो, कोबीची 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरचीची 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांद्याची 50 ट्रक, आंध्र प्रदेश आणि इंदूर येथून 55 ट्रक बटाटा इतकी आवक झाली. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा100-140 बटाटा170-210 लसूण70-450 आले सातारी150-350 भेंडी300-400 गवार : गावरान व सुरती400-600 टोमॅटो80-120 दोडका400-500 हिरवी मिरची450-600 दुधी भोपळा150-250 चवळी300-350 कारली : हिरवी400-450 पांढरी300-350 पापडी500-550 पडवळ250-300 काकडी180-220 फ्लॉवर300-350 कोबी150-180 डिंगरी300-350 नवलकोल80-100 ढोबळी मिरची250-350 तोंडली : कळी400-500 जाड200-250 शेवगा350-450 गाजर300-400 वालवर550-600 बीट150-180 घेवडा600-700 कोहळा100-150 आर्वी200-250 घोसावळे300-350 ढेमसे250-300 भुईमुग शेंग400-450 मटार : स्थानिक700-750 पावटा400-450 तांबडा भोपळा60-100 सुरण200-220 मका कणीस50-100 नारळ (शेकडा)1000-1600.