मुंबई : भाजपतर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये ईशान्य मुंबईमधून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आल्याने येथील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्ता कट झाला आहे. आता याबाबत खुद्द किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना किरीट सोमय्या यांनी उमेदवारी न मिळाल्याबाबत बोलताना, “मी मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईमधून उमेदवारी दिल्याबाबत खुश असून आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते मिळून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू. आमचं सर्वांचं ध्येय एकच असून आम्हा सर्वांना पंप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी पाहायचं आहे. माझ्या उमेदवारीबाबत बोलायचं झाल्यास पक्षामध्ये काम करत असताना जबाबदाऱ्यांची अदलाबदल होत असते त्यामध्ये काही नवीन नाहीये.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Kirit Somaiya,sitting BJP MP from Mumbai North East: Very happy that Manoj Kotak ji standing with me here has got the ticket. We all will support him and ensure he wins.Ultimately our aim is a second term for Modi ji. Responsibilities within party keep shifting,nothing new in it. pic.twitter.com/5sIE2XCGcX
— ANI (@ANI) April 3, 2019