मुंबईत पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव सुरू..

मुंबई – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवास आज प्रारंभ झालाआहे. संजीवनी भेलांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची सुरुवात झाली.
अंकिता जोशी, कलाकार रवी चारी यांच्या वाद्य संगीताचा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर सादरीकरण करतील. रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी रमाकांत गायकवाड यांच्या शास्त्रीय गायनाने सुरुवात होईल, शास्त्रीय गायिका मधुवंती बोरगावकर यांच्या गायनाच्या सादरीकरणाचा कार्यक्रम होईल. पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांचे देखील सादरीकरण होईल, अभिजित पोहनकर यांच्या वाद्य संगीताच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होईल.
गायिका सानिया पाटणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल, तर सोमवार ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीधारक यश कोल्हापुरे, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीधारक मृणालिनी देसाई यांचे सादरीकरण होईल.
छत्रपती संभाजीनगर येथील गायिका चंदल पाथ्रीकर यांचे गायन होईल. नंदिनी शंकर यांचे वाद्य संगीताचे सादरीकरण होईल. अर्चिता भट्टाचार्य यांचे गायन होईल आणि शास्त्रीय संगीत गायिका मंजुषा पाटील यांचे गायन सादरीकरणाने या समारंभाची सांगता होईल.





