साश्रूनयांनी अखेर ‘महादेवी’ हत्तीणी वनताराला सुपूर्द; ग्रामस्थांचा विरोध, मिरवणुकीत दगडफेक

Nandani Mahadevi Elephant | कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील लाडकी हत्तीण ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ला अखेर गुजरातमधील ‘वनतारा’मध्ये रवाना करण्यात आले आहे. मिरवणूक काढून महादेवी हत्तीणीला ग्रामस्थांनी निरोप दिला.
मात्र सोमवारी ‘महादेवी’ला वनताराच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करताना संतप्त जमावाने दगडफेक केला. यात दोन पोलिस वाहनांचे नुकसान झाले. मात्र पोलिसांनी लाठीमार करून जमाव नियंत्रणात आणला. हत्तीला गावातून नेण्याला विरोध असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नांदणीकराना अश्रू अनावर
मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर अॅनिमल अॅम्ब्युलन्समधून हत्तीणीला रवाना करण्यात आलं. या सगळ्या मिरवणुकीदरम्यान नांदणीकराना अश्रू अनावर झाले होते. 35 वर्षे नांदणीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘महादेवी’च्या जाण्याने गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
काय आहे प्रकरण ?
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे ही हत्तीण होती. महादेवी असं या हत्तीणीच नाव आहे. प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानंतर नांदणी येथील हत्तीणीला गुजरातच्या वनतारा याठिकाणी रवाना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु ग्रामस्थांनी या हत्तीणीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. Nandani Mahadevi Elephant |
गावात हत्तीणीला नेण्यासाठी विरोध करत मोठा मोर्चा देखील काढण्यात आला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात धाव घेतलेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर 28 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात हत्तीणीला गुजरातला नेण्यात आलं. या हत्तीणीची मिरवणूक काढून तिला निरोप देण्यात आला. निरोप देताना सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते. जिनसेन भट्टाचारक महाराज यांच्या डोळ्यातही अश्रूधारा होत्या.
‘वनतारा’ उपक्रम काय आहे?
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने जामनगरमध्ये प्राणी कल्याणासाठी ‘वनतारा’ हा उपक्रम सुरू केला. हा ‘वनतारा’ इनिशिएटिव्ह जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये 3000 एकरमध्ये पसरलेला आहे. येथे बचाव आणि पुनर्वसन केंद्र 350 एकर जागेवर बांधले आहे.
‘वनतारा’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत 200 हून अधिक हत्ती आणि हजारो पक्षी, सरपटणारे प्राणी आणि इतर प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय ‘वनतारा’मध्ये मगरी, बिबट्या, गेंडा या प्रमुख प्रजातींच्या पुनर्वसनाची व्यवस्थाही आहे.
3000 एकरमध्ये पसरलेल्या ‘वनतारा’मध्ये अत्याधुनिक एलिफंट सेंटर देखील असेल. यात एक हायड्रोथेरपी पूल, वॉटर बॉडी आणि हत्तींच्या संधिवातावर उपचार करण्यासाठी जकूझी देखील असेल. येथे 500 लोकांचा प्रशिक्षित कर्मचारी हत्तींची काळजी घेतात. त्यात 25 हजार स्क्वेअर फुटांचे रुग्णालयही आहे. यामध्ये सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे आहे.
हेही वाचा :





