कोरेगाव भीमा -येथील एका 31 वर्षीय युवकास करोनाची बाधा झाल्याचा अहवाल 28 मे रोजी आला होता. त्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती स्थिर आहे. पुन्हा त्याची तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अहवाल निगेटिव्ह आला.
ढहा रुग्ण आढळलेल्या ढेरंगे वस्तीवरील त्या भागाचे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या 9 लोकांच्या चाचण्या देखील निगेटिव्ह आल्या असल्याचे शिक्रापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे व पर्यवेक्षक जालिंदर मारणे यांनी सांगितले.