शिराळा – शिराळा बायपास रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खून करून मृतदेह आयटीआय नात रस्त्यावर श्री आलय हॉटेल जवळ असणाऱ्या रस्त्याला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून देण्यात आले होते. पलूस येथील राजेश वसंतराव जाधव (वय 53) यांचा खून करून शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित देवराज उर्फ दिव्या चंद्रकांत शेवाळे (वय 24, मूळ गाव शेवाळवाडी, ता. कराड, सध्या रा. रुक्मिणीनगर सुभद्रानगर सदन बंगला) व संशयिताची पत्नी साक्षी राजेश जाधव (रा. पलूस) व शोभा राजेश जाधव यांनी खुनाची कबुली दिली आहे. त्यामुळे या तिघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आयटीआय कॉलेज ते नाथ मंदिर जाणाऱ्यारे शिराळा बायपास रस्त्यावरील सुरले वस्तीजवळ श्री आलय हॉटेलच्या अलीकडे साकव पुलाच्या खाली पूर्व बाजूस कोणीतरी अज्ञाताने अनोळखी व्यक्तिचा खून करून त्याचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळयास व शरीरास बांधून सतरंजीमध्ये गुंडाळून प्रवासी बॅगमध्ये घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने दि. २० मे रोजी फेकून दिला होता. मतदेह पूर्ण सडला असल्याने तो सांगाडा पुरुष अगर स्त्री जातीचा, त्याचे वय, किती दिवसापूर्वी मृत्यू झाला याबाबत निश्चित सांगता येत नव्हते, असा गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोखर व उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. संदीप घुगे यांनी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच तपास पथके तयार करुन त्यांच्यात कामाचे वाटप करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. घटनास्थळी आढळलेली प्रवासी बॅग व मृताचे कपडे तसेच बेपत्ता व्यक्ती याआधारे तपास सुरु केला. मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपन्यांमधून माहिती घेऊन तपास केला असता त्यातील एक बॅग पलूस येथे विक्रीस आली होती,असे समजले. तेथील बॅग विक्रेत्याकडून बॅग घेणाऱ्याच्या वर्णनावरुन रेखाचित्र तयार करुन तपास सुरु केला. पलस पोलीस ठाण्यात दाखल बेपत्ता व्यक्तींचा शोध घेताना वेराजेश वसंतराव जाधव यांचे नातेवाइक देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे, साक्षी राजेश जाधव, शोभा राजेश जाधव यांच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळल्याने विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. मृत राजेश यांना दारुचे व्यसन होते. असुन तो त्याची पत्नी शोभा हिचेवर संशय घेत होता. त्याकारणावरुन तो पत्नी शोभा हिस वरचेवर मारहाण करुन त्रास देता होता. त्या कारणावरुन तिन्ही आरोपींनी फेब्रुवारी महीन्यात राजेश वसंतराव जाधव याचा खून करुन त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे हद्दीत टाकुन दिले होते अशी त्यांनी कबुली दिलेने त्यांना उपरोक्त गुन्हयात अटक करणेत आली आहे. सदरचे गुन्हयात मृत व्यक्तीबाबत व आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहीती नसताना पोलीस पथकाने अथक परीश्रम घेवुन मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अपर पोलीस अधीक्षक सौ रितु खोखर सो यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण सोो यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पोलीस निरीक्षक श्री सतिश शिंदे स्था.गु.अ.शाखा सांगली, स.पो.नि./हरिषचंद्र गावडे, स.पो.नि./ प्रविण साळुंखे, स.पो.नि. युवराज सरनोबत, म.स.पो.नि./अनिता मेनकर स.पो.नि. सिकंदर श्रीवर्धन, पो.उप.नि./जयनाथ चव्हाण, पो.उप.नि/ गणेश खराडे, पो.उ.नि.कुमार पाटील सपोफी / महेश गायकवाड, पोहेकों / कालीदास गावडे, पोहेकों/नितीन यादव, पोहेकों/संदिप पाटील, पोहेकों/शरद जाधव, पोना/शरद बावडेकर, पोना/प्रशांत देसाई, पोना/अमर जाधव, पोकों/शशिकांत शिंदे, पोकों/शदर पाटील, पोकों/राहुल पाटील, चापोकों/सुनिल पाटील, चापोकों/नागराज मांगले यांनी गुन्हा उघडकीस आणणेस परीश्रम घेतले आहेत. मा पोलीस अधिक्षक साो सांगली यांनी वरील तपास पथकास उत्कृष्ट तपास केलेबाबत बक्षीस जाहीर केले आहे.