देव-देवतांच्या मूर्तींचे समाजकंटकांकडून खंडन, संतप्त जमावाची दगडफेक

Bhagalpur । बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी सन्हौला येथील मंदिरात मुर्त्यांची तोडफोड केली. समाजकंटकांनी मंदिरातील देवी दुर्गा, श्रीराम, सीता, राधा आणि कृष्ण यांच्या मूर्त्या खंडित दागिन्यांची चोरी केली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
Bhagalpur । संतप्त जमावाची दगडफेक
घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. जमावाने घोघा-सन्हौला मुख्य रस्ता देखील बंद केला. यावेळी टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
Bhagalpur । लाठीचार्ज आणि गोळीबार केला
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि जमावाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने दगडफेक सुरूच ठेवली, ज्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे, आणि पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांकडून जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरु अद्यापही सुरु आहेत.
Bhagalpur । समाजकंटकांना अटक, अफवा पसरवू नका
पोलिसांनी या प्रकरणात एका विक्षिप्त व्यक्तीला अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Bhagalpur । परिसरात तणावाचे वातावरण
मंदिरात मूर्त्या खंडित झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र रोष आहे. सकाळी पूजा करण्यासाठी आलेल्या भक्तांना या तोडफोडीची माहिती मिळाल्यानंतर वातावरण आणखी तापले. पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या या मंदिरात घडलेल्या घटनेवरून पोलीस प्रशासनावरही टीका होऊ लागली आहे.





