पुणे – फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या, छत्रपती शासन यासारखे मराठी चित्रपट, तर नेटफ्लिक्स वरील ‘सेक्रेड गेम्स’या लोकप्रिय सीरीज मध्ये लक्षवेधी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते ‘रामचंद्र धुमाळ’ यांचं पुण्यात निधन झाले आहे. रामचंद्र धुमाळ हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
‘सेक्रेड गेम्स’या लोकप्रिय सीरीज मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने साकरलेल्या गणेश गायतोंडे या पात्राच्या वडिलांची भुमिका रामचंद्र धुमाळ यांनी साकारली होती.
रामचंद्र धुमाळ खूप उशीरा चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी वयाच्या उत्तरार्धात चित्रपटात काम करायला सुरूवात केली. पण त्यांच्या भूमीकेतून चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.