Sanjay Shirsat : नाशिक येथील बहुचर्चित कॉर्पोरेट कंपनीतील धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य संशियत आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी यापूर्वी काही जणांना अटक केली होती. मात्र, निदा खान ही पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाली होती. तिचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. अशताच आता या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Sanjay Shirsat ) तिला (निदा खान) ज्यांनी सपोर्ट केला ते एमआयएम होतं. एमआयएम माजी खासदार इम्तियाज जलील यांनी निदा खानला पाठिंबा दर्शवला होता. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सर्व प्रकार या महाशियाच्या नेतृत्वात होतात, असा खळबळजनक आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. निदा खान एक मोहरा असून असे अनेक जण आहेत. त्यांचं नेटवर्क महाराष्ट्रभर पसरलेलं असल्याचा संशय शिरसाटांनी व्यक्त केला आहे. आरोप करून न थांबता संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांची पोलीस चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी गृहविभागाकडे केली आहे. एका गुन्हेगाराला राजकीय संरक्षण दिले जात असेल, तर ते राज्याच्या सुरक्षेसाठी घातक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचे देखील संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. प्रकरण काय? (Sanjay Shirsat ) नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळ असे हे प्रकरण आहे. या प्रकरणात नऊ गुन्ह्यांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. Sanjay Shirsat : इम्तियाज जलील यांनी निदा खानला पाठिंबा दर्शवला होता ; संजय शिरसाटांच्या आरोपांनी खळबळ पोलिसांनी या प्रकरणातील तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरूख कुरेशी आणि रझा रफीक यांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात या आरोपींचे आर्थिक आणि सामाजिक नेटवर्क परदेशापर्यंत किंवा मोठ्या संघटनांपर्यंत जोडलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा : Rice Eating Tips: रोज भात खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात