Imran Khan: सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बिघडत्या प्रकृतीबाबत चौदा माजी पाकिस्तानी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिले आहे. त्यांनी सध्याचे पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना तुरुंगात योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी केली आहे. इम्रान ८०० दिवसांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, ज्यामुळे तुरुंगातील त्यांच्या उपचारांबद्दल प्रश्न आणि चिंता निर्माण होत आहेत.इम्रान खान यांची बहीण अलिमा खानुम यांनी माजी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या तुरुंगातील वागणुकी आणि त्यांच्या बिघडत्या प्रकृतीविरुद्ध आवाज उठवला होता. Imran Khan: वृत्तानुसार, या पत्रावर बेलिंडा क्लार्क, ग्रेग चॅपेल, मायकेल आथर्टन, सुनील गावस्कर, कपिल देव, नासेर हुसेन, इयान चॅपेल, मायकेल ब्रेअरली, अॅलन बॉर्डर, डेव्हिड गॉवर, किम ह्यूजेस, क्लाइव्ह लॉयड, स्टीव्ह वॉ आणि जॉन राईट यांनी स्वाक्षरी केली आहे. एका डोळ्यात फक्त १५% दृष्टी शिल्लक Imran Khan: इम्रान खान दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी एका वकिलाने न्यायालयात दावा केला होता की इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यात फक्त १५% दृष्टी शिल्लक आहे. त्यांनी आरोप केला की अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपासून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी काहीही केले नाही. सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह चौदा माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून इम्रान खान यांना तुरुंगात योग्य वागणूक मिळावी अशी मागणी केली आहे. इंग्रंजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पत्रात असे म्हटले आहे की, “आम्ही, आमच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचे माजी कर्णधार, पाकिस्तानचे प्रसिद्ध माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटचे दिग्गज इम्रान खान यांच्या कथित वागणूक आणि तुरुंगातील परिस्थितीबद्दल खोलवर चिंता व्यक्त करत आहोत.” Imran Khan: