इम्रानना भेटल्यानंतर ट्रम्प मोदींना भेटणार

संयुक्‍त राष्ट्राच्या सर्वसाधारण बैठकीबरोबर “हॉडी मोदी’ समारंभातही होणार सहभागी

वॉशिंगन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतील, त्याच दिवशी ते ह्यूस्टनमध्ये होणाऱ्या “हॉडी मोदी’ या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सामील होतील आणि मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये मोदींबरोबर पुन्हा बैठक घेतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्‍त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेच्या 74 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथे भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांसमवेत दोन्ही बैठका होणार आहेत.

ह्यूस्टन येथे “हॉडी मोदी’ कार्यक्रमात दोन्ही नेते 50,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन लोकांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर ट्रम्प रविवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये येतील अशी अपेक्षा आहे, त्यानंतर ट्रम्प्‌ ओहायोच्या दौर्यावर जातील. तेथे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतील.

सोमवारी संयुक्‍त राष्ट्राच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प पहिल्यांदा धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीचे जागतिक आवाहन ट्रम्प करतील. त्यानंतर ट्रम्प पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज सेबस्टियन डूडा, न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन, सिंगापूरचे पंतप्रधान ली हिसियन लोंग, इजिप्तचे अध्यक्ष अल सिसी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून आदी नेत्यांसमवेत भेट घेणार आहेत.

मंगळवारी ट्रम्प आपले संयुक्‍त राष्ट्राच्या अधिवेशनातील दुसरे भाषण देतील. त्यानंतर ते ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आदींबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. इराकच्या ध्यक्षंचीही ते भेट घेतील.

मंगळवारी मोदी-ट्रम्प यांची होणारी बैठक ही या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांमधील चौथी भेट असेल. पुढील काही वर्षांत उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा सूर न्यूयॉर्कमधील बैठकीत निश्‍चित होईल, अशी अपेक्षा आहे.

दोन्ही नेते द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर चर्चा करणार असून त्यात अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रिया, वाढते संभाव्य संरक्षण आणि उर्जाविषयक व्यवहार आणि द्विपक्षीय व्यापार विवाद सोडविण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.