महत्वाची बातमी! बालकांच्या लसीकरणाची Cowin appवर आजपासून नोंदणी सुरू
Updated On:

नवी दिल्ली – देशातील बालकांनाही आता कोविडची लस देण्याचा पहिला टप्पा सुरू करण्यात येत असून त्यासाठी 15 ते 18 वयोगटातील बालकांच्या लसीकरणाची नोंदणी आज पासून सुरू करण्यात आली आहे. कोविन ऍपवर ही नोंदणी करून घेतली जात आहे.
पालकांनी आपल्या बालकांची यासाठी नोंदणी सुरू करावी असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्विटरवर केले आहे. नववर्ष दिनाची संधी साधून ही नोंदणी सुरू करण्यात आली असून प्रत्यक्ष लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू केले जाणार आहे.
आत्तापर्यंत देशात 18 वर्षावरील लोकांचेच लसीकरण केले जात होते. तथापि त्या वर्गातील सुमारे 60 टक्के लसीकरण पुर्ण झाल्याने आता बालकांसाठीच्या लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्याने हाती घेतली जात आहे. विदेशांमध्ये बालकांचे लसीकरण या आधीच सुरू झाले आहे.





