सोशल मिडीयातील ‘तो’ दावा खोटा; एनडीए कॅडेट्सच्या संख्येबाबत महत्वपूर्ण माहिती
Updated On:

नवी दिल्ली – सरकारने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएतील कॅडेट्सची संख्या कमी केली असल्याची बातमी काल सोशल मिडीयावर प्रसारीत झाली होती. पण त्याचा एनडीएचे कमांडंट लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी इन्कार केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, एनडीए मध्ये नवीन वर्षासाठी 389 छात्रांची निवड करण्यात आली आहे.सध्या एनडीएचा 144 वा कोर्स सुरू होत आहे. त्यासाठी ही नवीन भरती करण्यात आली आहे. या नवीन छात्रांमध्ये 370 छात्र भारतीय असतून मित्र देशांचे एकूण 19 छात्र यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
एनडीएतील छात्र घटले असल्याचा सोशल मिडीयातील दावा खोटा आणि बदनामीकारक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एनडीएची ही प्रबोधिनी पुण्या नजिक आहे. त्यात संपुर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये भरतीसाठी बरीच चुरस असते.





