पिंपरी | जीवन-मृत्युच्या संघर्षात रक्तदानाचे महत्व कळते – इम्रान शेख

पिंपरी, (प्रतिनिधी) – खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या वतीने सांगवी येथे ‘रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून ९४ लोकांनी रक्तदान केले, अशी माहिती राष्ट्रवादी युवकचे (शरद पवार) शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष सोनाली नितनवरे, ताहिराबी सय्यद, प्रशांत काळेल, मयुर खरात, आश्रफ शेख, अवधूत कदम, सिद्धांत जानराव, प्रणव मस्के, तेजस आवळे,
शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित सुहासे, प्रभाग अध्यक्ष नवी सांगवी अभिषेक मेमसादे, तेजस पाटील, आशिष खत्री, विद्यार्थी काँग्रेस चिंचवड विधानसभेचे मुख्य सरचिटणीस अरबाज खान, महाविद्यालयीन समन्वयक स्वप्नील खंडागळे आणि महाविद्यालयीन अध्यक्ष आर्यन धोत्रे, अरबाज शेख, साहिल वाघमारे, मयूर खरात आदी उपस्थित होते.
या शिबिरात युवक, पुरुषांबरोबर महिलांनी देखील मोठ्या संख्येने रक्तदान केले. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवकचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे आणि युवक पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.





