वाहनांच्या निर्यातीवर झाला परिणाम
Updated On:

मुंबई – लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीवर 75 टेक्क् परिणाम झाला.
एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादकांनी केवळ 43 हजार 748 वाहनांची निर्यात केली. गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये 1 लाख 73 हजार इतकी वाहने निर्यात केली होती. या तीन महिन्यांमध्ये कंपन्यांच्या उत्पादनावर, त्याचबरोबर देशांतर्गत वाहतुकीवर परिणाम झाला होता. अर्थात, या काळात आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरही परिणाम झाला असल्यामुळे मिळालेल्या ऑर्डरही पूर्ण करता आल्या नाहीत.





