Pune Ganpati Visarjan 2025। पुण्याच्या पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मानाच्या पाच गणपती बाप्पासह इतर गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकेला अनेक मंत्री उपस्थित राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, माधुरी मिसाळ, उपसभापती नील गोऱ्हे या राजकीय मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणूकीला हजेरी लावली आहे. मंत्र्यांची उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.