पुणे जिल्हा विकास मंचची बैठकीत मागणी : पालकमंत्र्यांना भेटणार
शिक्रापूर -खरेदीखत व सातबारा नोंदी पूर्ववत सुरू करण्यासाठी व स्वाधीन क्षत्रिय समितीचा अहवाल मंजूर करून तुकडा बंदी कायदा रद्द किंवा शिथील करण्यासंदर्भात व खरेदीखत आणि सातबारा नोंदी पूर्ववत सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती पुणे जिल्हा विकास मंचचे कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा विकास मंचाचे अध्यक्ष सदाशिव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक पार पडली, यावेळी मराठवाडा रहिवासी संघटनेचे अध्यक्ष रूपेश बेद्रे पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र दणके, सभापती अशोक खांदवे, संजय सातव पाटील, हिरामण काकडे, मिलींद भोसूरे, रामकृष्ण शितोळे, नारायण गायकवाड, राजू राजूरकर, श्रीपतराव नवले, चंपालाल सुराणा, शिरूरचे मंचाचे अध्यक्ष पी. के. गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्लॉट डेव्हलपर्स आणि बांधकाम व्यावसायिक व ग्राहक गेल्या काही महिन्यांपासून महारेरा आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय नसल्यामुळे गुंठ्याचे आणि सदनिकांचे खरेदीखत होण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाल्याने त्रस्त झाले आहेत. एक दोन गुंठ्यांचे नोंदी 7/12 वर बंद असून त्या नोंदी सुरू न केल्यामुळे विपरित परिणाम होण्यास सुरूवात झाली आहे.
त्यावर चर्चा, उपाययोजना आणि खरेदीखत पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्याकरिता प्राथमिक मिटींग झाली आहे. पुढे त्वरित येत्या मंगळवारी किंवा बुधवारी जिल्हा निबंधक जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी नवीन अध्यादेशाला तात्पुरती स्थगिती देऊन नोंदणी पूर्ववत करा, असे निवेदन देण्याचे ठरले आहे. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.