Weather Alert : पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई – मुंबई हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अॅलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने रविवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अॅलर्ट तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अॅलर्ट जारी केला आहे.
Severe weather warnings issued by IMD for Maharashtra for 10-14 July 2021 at District level.
येत्या ५ दिवसासाठी IMD ने आज दिलेले महाराष्ट्र राज्यासाठीचे तीव्र हवामानाचे इशारे … pic.twitter.com/n7FFnmu7Qd— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 10, 2021
पुढील तीनही दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा तर पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी (12 जुलै) नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मंगळवारी (13 जुलै) परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना येलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
बुधवारी (14 जुलै) जालना परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.





