डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत IMAने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र; ‘या’ पाच मागण्या केल्या

IMA Wrote Letter To Pm Modi | कोलकतामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर संतप्त लोकांनी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलची तोडफोडही केली. सध्या या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ IMA ने शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात 24 तासांसाठी विना-आपत्कालीन सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कोलकतामधील घटनेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा आणावा आणि रुग्णालयांना अनिवार्य सुरक्षा अधिकारांसह सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिण्यात आले आहे.
आयएमएने पाच मागण्या
- डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्याने विचार व्हावा. महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची गरज आहे.
- डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय कायदा कठोर करत ठोस उपाययोजना करण्याची मागणीही या पत्रातून पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
- रुग्णालयात सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांची व्यवस्था चांगली असण्याची मागणी केली आहे.
- डॉक्टरांची शिफ्ट 36 तासांपर्यंत होत असल्यानं महिला डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्सना रेस्ट रुम पुरवाव्यात, असंही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय कायद्याची मागणी
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा करण्याची मागणीही आयएमएने केली आहे. IMA ने गुन्ह्याचा काळजीपूर्वक तपास करावा तसेच बर्बरतेमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवून आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरजी कार घटनेने रुग्णालयातील हिंसाचाराचे दोन आयाम समोर आणले आहेत. महिलांसाठी सुरक्षित जागा नसल्यामुळे बर्बर प्रमाणात गुन्हा आणि संघटित सुरक्षा प्रोटोकॉलच्या अभावामुळे गुंडगिरी, गुन्हे आणि क्रूरपणामुळे राष्ट्राच्या विवेकाला धक्का बसला आहे.
60 टक्के भारतीय महिला डॉक्टर
IMA ने त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात महिलांच्या सुरक्षेबाबत पंतप्रधानांच्या टिप्पणीचेही कौतुक केले. IMA म्हणाले, आम्ही यावेळी तुमच्या हस्तक्षेपाची विनंती करतो. यामुळे केवळ महिला डॉक्टरांनाच नाही तर कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला आत्मविश्वास मिळेल. भारतीय 68 टक्के डेंन्टल डॉक्टर्स, 75 टक्के फिजिओथेरपिस्ट आणि 85 टक्के नर्सिंगमध्ये असल्यानं आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार व्हावा, असंही पत्रात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
‘बिसरा ते वॉश बेसिनपर्यंतचा बदला…’ ; सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता पोलिसांवर केले मोठे आरोप





