सातारा, {संदीप राक्षे} – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरातील अवैध बांधकामे व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या मुळावर येणार आहे. ही अतिक्रमणे प्रकल्पाचा मूळ हेतू धोक्यात आणू शकतात त्यामुळे सह्याद्री व्याघ्र राखीवच्या यंत्रणेने तातडीने या आक्रमणांना पायबंद घालणे गरजेचे आहे . सह्याद्री वाचवा अभियान हे सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले आहे. गावक्षेत्रातील खाजगी जमिनी विकल्या जाणार नाहीत असे काही ठराव गावाकडून होऊ लागले आहेत. असे असतानाही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील गावे आणि तेथील जमिनी धनदांडग्यांना विकल्या जात असल्याची पोलखोल साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली होती. महाबळेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील झाडाणी गाव परिसरातील रिसॉर्टचे बांधकाम असेच वादाचे केंद्र ठरले आहे. झाडाणी या गावाचे पुनर्वसन यापूर्वीच रायगड जिल्ह्यात झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एकूण विस्तार साडेचारशे चौरस मैल असून कोअर झोन 232.71 चौरस मैल तर बफर झोन 218 चौरस मैल इतका आहे. 2008 मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावली पाटण सांगली जिल्ह्यातील शिराळा चांदोली अभयारण्य तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर चिपळूण आणि सातखेडे या क्षेत्रांना मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात 21 गावे तर बफरक्षेत्रामध्ये 60 गावे आहेत या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला व्याघ्र प्राधिकरणाने मान्यता देऊनही येथे वाघ नसल्याची आवई उठवण्यात आली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये चांदोली अभयारण्याच्या कोअर झोन मध्ये एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले होते तसेच वन्यजीव प्राधिकरणाने या क्षेत्रात सात नर आणि मादी वाघांच्या जोड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि येथील अन्न साखळी टिकवण्याचे प्रयत्न सुरू असताना येथील वाढती बांधकामे हा चिंतेचा विषय आहे. गुजरात मधील काही धनदांडग्यानी मश्वर तालुक्यात डोंगरावरील जमिनी खरेदी केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार कसे झाले त्यांना लाईट पाणी इत्यादी सुविधा कशा मिळाल्या हे खरोखर संशोधनाचे विषय ठरावेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये जागांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याचे खरे आव्हान वनविभागासमोर आहे. व्याघ्र अधिवासाला धोका निर्माण झालाय सह्याद्री मधील राखीव वनक्षेत्रांना लागून असणाऱ्या खाजगी जमिनीत देखील वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने घातक ठरत आहेत. कारण या खाजगी जमिनीवर आणि अननस यासारख्या पिकांची लागवड होत आहे. यासाठी जमिनीवर नैसर्गिक वाढलेले जंगल कापून त्याला कुंपण घातले जात आहेत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तसेच रत्नागिरी येथे खाजगी जमिनी लागवडीखाली आणण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चोरट्या शिकारीच्या वाढत्या प्रमाणामुळे व्याघ्र अधिवासाला धोका निर्माण झाला आहे सह्याद्रीमध्ये कमी प्रमाणात असलेल्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या व्याघ्र अधिवासाला पोषक नाही वाघांचे भक्ष असणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या गवताळ क्षेत्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. अनेक वनपट्ट्यांवर खाण माफियांचा डोळा सातारा व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये क्षेत्रांमध्ये गवताळ अधिवासाचीच प्रमुख समस्या आहे अभयारण्य क्षेत्रामधील गावांचे पुनर्वसन करून मोकळ्या जागेत गवताळ अधिवास निर्माण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत याशिवाय खाण कामासाठी सह्याद्रीमधील अनेक वनपट्ट्यांवर खाण माफियांनी डोळे वटारलेले आहेत. वाघाचा भ्रमण मार्ग कसा सुरक्षित करता येईल यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मुख्य वनसंरक्षक कलेमेंट बेन यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर तालुक्यात कोअरझोन मध्ये होणारी वाढती बांधकामे हा सुद्धा चिंतेचा विषय आहे.