Mahesh Landage : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत एकमेकांवर टोकाची टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. तसेच भष्ट्राचाराचा आक्का असा अप्रत्यक्ष उल्लेख भाजप आमदार महेश लांडगे यांचा केला होता. मी कधी कुणाच्या नादी लागत नाही, पण कुणी माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही, असा थेट इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे. आता येथे आयोजित एका सभेतून महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेत त्यांना ओपन चॅलेज देत एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपांची राळ उठवली जात आहे. येथील एका जाहीर सभेतून भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्याविषयी केलेल्या एका जुन्या विधानाची मिमिक्री करत एकेरी शब्दांत टीका केली आहे. यामुळे आता राजकारण चांगलेच तापणार असल्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांच्याविषयी २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो, अशी टीका केली होती. या विधानाचा आधार घेत महेश लांडगे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले. आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी जर ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का? असे महेश लांडगे म्हणाले आहेत. पुढे बोलताना महेश लांडगे म्हणाले, अरे आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत. याच तुझा कार्यक्रम करतील. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू. असा इशाराच दिला. आपले देवा भाऊ शांत बसतात, पण एखाद्याला इशारा देतात. त्याला तो इशारा समजला की मग 70 हजारांचा घोटाळा करणारे पण आपले घोटाळा काढणारे जमा होतात, असे विधान करत अजित पवार यांना डिवचलं आहे. तेच महाराष्ट्राचे आका अजित पवार यांनी केलेल्या आकाच्या टीकेला महेश लांडगे यांनी जोरदार प्रत्युतर देत पलवार केला आहे. एक तर तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला भाजपमध्ये आलात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा. मला पिंपरी चिंचवडचा ते आका म्हणतायेत, मुळात तेच महाराष्ट्राचे आका आहेत. हेही वाचा : Yami Gautam: ‘हक’नंतर यामी गौतमचा नवा प्रयोग; हॉरर-कॉमेडी चित्रपटातून करणार प्रेक्षकांचं मनोरंजन