Rakul Preet Singh: “एकदा चूक झाली तर…”; रकुल प्रीत सिंहचे वक्तव्य चर्चेत
Rakul Preet Singh रकुल म्हणाली की, “एखाद्याकडून आयुष्यात एकदा चूक होऊ शकते. आयुष्य खूप मोठं आहे. एका चुकीसाठी कायम एखाद्याला दोष देत राहणं योग्य नाही.”

Rakul Preet Singh: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या ‘पति पत्नी और वो २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असतानाच रकुलने नात्यातील फसवणूक आणि माफी यावर स्पष्टपणे आपले मत मांडले आहे. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
एका मुलाखतीदरम्यान रकुलला विचारण्यात आले की, नात्यातील धोका किंवा बेवफाई कधी स्वीकारता येऊ शकते का? यावर तिने सुरुवातीलाच ठामपणे “नाही” असे उत्तर दिले. तिच्या मते, नात्यात फसवणूक योग्य नाही. मात्र त्यानंतर तिने माफीबाबत वेगळा दृष्टिकोन मांडला.
रकुल म्हणाली की, “एखाद्याकडून आयुष्यात एकदा चूक होऊ शकते. आयुष्य खूप मोठं आहे. एका चुकीसाठी कायम एखाद्याला दोष देत राहणं योग्य नाही.” मात्र तिने हेही स्पष्ट केले की, ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नव्हती. तिने सांगितले की, जर एखाद्याला माफ करायचे असेल, तर ती चूक विसरण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर नातं पुढे नेणं कठीण होतं.

Rakul Preet Singh
या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा तिच्या आणि तिचे पती जॅकी भगनानी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी जॅकी भगनानी यांनी त्यांच्या लग्नाला “सिचुएशनशिप” असे म्हटले होते. या शब्दामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला आणि दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली.
यानंतर रकुलने एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत या चर्चेला हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तर दिले. त्या व्हिडिओमध्ये ती जॅकीला कान पकडायला सांगताना दिसली. मजेत ती म्हणाली, “आपण मिलेनियल्स आहोत, जेन-झी बनायची गरज नाही असं सांगितलं होतं ना?” त्यावर जॅकीने हसत “सॉरी” म्हटले. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रकुल प्रीत सिंह नुकतीच आयुष्मान खुराना, वामिका गब्बी आणि सारा अली खान यांच्यासोबत ‘पति पत्नी और वो २’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.





