Suresh Dhas : दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर….; ते फोटो पाहिल्यानंतर धसांची पोस्ट, आता ‘ही’ मागणी करणार

बीडः गेल्या दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरंपच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्र हळहळला होता. या प्रकरणाचा मास्टरमाईंट वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे. काल माध्यमांत देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली याचे फोटो व्हायरल झाले.
या फोटोत आरोपींनी क्रूरतेचे परिसीमा ओलांडल्याचे दिसत आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता आरोपींना फाशींची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच बीड जिल्हा बंदीची हाकही देण्यात आली आहे. यावर आता या प्रकरणी आक्रमक भूमिका घेणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले. देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय. आता दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी धस यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून ही मागणी केली आहे.
तसेच ज्या तळमळीने आणि तडफडीने हे प्रकरण लाऊन धरले आहे, त्याच पद्धतीने आरोपी फासावर जात नाहीत तोपर्यंत मी या प्रकरणी तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली असून, आताा ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.
स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले.
माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो…
— Suresh Dhas (@SureshDhasBJP) March 4, 2025
आमदार सुरेश धस यांची पोस्ट
माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली हे विकृतीचं लक्षण आहे. ही क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल. देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय. आता दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही हैवानियत जिवंत राहिली तर कोणीही सुरक्षीत राहणार नाही. त्यासाठी आत्तापर्यंत मी ज्या तळमळीने आणि तडफडीने हे प्रकरण लाऊन धरले आहे त्याच पद्धतीने आरोपी फासावर जात नाहीत तो पर्यंत मी या प्रकरणी तसूभरही मागे हटणार नाही. आता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावी यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.





