Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी त्यांच्या रोखठोक विधानांमुळे अडचणीत सापडतात. त्यांनी केलेली विधानांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत असते. आता पुन्हा एकदा अजित पवार हे एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या विधानाचा समाचार विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधील माळेगावातून काल शुक्रवारी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला. बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवर्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलता अजित पवार यांनी स्थानिकांना थेट धमकीच देणारे विधान केले. “तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करुन देईल. तुम्ही काट मारली तर मी पण निधीत काट मारणार,” असे विधान अजित पवार यांनी केले आहे. आपल्याच उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन त्यांनी केले. असे झाले नाही तर निधीमध्ये कपात होईल असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. त्यांनी केलेल्या या विधानावर आता विरोधकांकडून समाचार घेतला जात असून, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे विजय वडेट्टीवार म्हणाले… सगळीकडेच तसे धमकवणे सुरू आहे. आज एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मतदारांना खुलेआम धमकी देत आहेत. ते (अजित पवार) त्यांच्या हातात निधी आहे ते धमकी देतात. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे खालचे लोक सगळे धमक्या देतात. धमक्या देणे सुरू आहे. निधी देणार नाही, विकास होणार नाही, बघून घेऊ… अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. अंबादास दानवे काय म्हणाले? मला असं वाटत ही सौदेबाजी आहे किंवा याला धमकीही म्हणता येईल. तुमच्या हात मत आणि माझ्या हातात निधी द्यायचा आहे. निधी अजितदादांच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो अजित दादांच्या घरातून दिला जात नाही, असा निशाणा अंबादास दानवे यांनी साधला. अजित दादांसारखी जबाबदार व्यक्ती जर जनतेला धमकी देत असेल निवडणूक आयोग काय करतयं? असा सवालही दानवेंन उपस्थित केला. निवडणूक आयोग आता अजित दादांच्या घरीही पाणी भरायला जात आहे , असेही दानवे म्हणाले. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा : घटस्फोटानंतर ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; केळवणाचा शेअर केला व्हिडिओ