बोडारवाडी धरण राजकीय हेतूपुरस्पर अडकवण्याचा प्रयत्न करू नये : आ. शिवेंद्रराजे भोसले

Updated On:
बोडारवाडी धरण राजकीय हेतूपुरस्पर अडकवण्याचा प्रयत्न करू नये : आ. शिवेंद्रराजे भोसले

पाचगणी (प्रतिनिधी) – माझ्या जावलीतील 54 गावांच्या जनतेच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. मी कोणाच्या आरोपांना उत्तर देण्यास बांधिल नाही. मात्र माझ्या जावलीच्या बळीराजाच्या शेतीच्या व पिण्याच्या प्रश्नाला दिशाभूल करुन राजकीय हेतूपुरस्पर धरण अडकण्याचा प्रयत्न करत असेल , तर याद राखा योग्य पद्धतीने योग्य वेळेतच योग्य उत्तर देऊ, असा सूचना वजा इशारा सातारा-जावली विधानसभेचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला . ते आबेघर येथे आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होते.

धरणाच्या क्षमतेबाबत चुकीचा गैरसमज पसरवुन प्रचार व प्रसार सुरु आहे. त्याच्याबाबतीत मला कोणतही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मला माझ्या जावळी तालुक्यांतील  शेतकऱ्यांकरिता  बोडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे . धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता माझा प्रयत्न राहिला आहे . जिल्हाअधिकारी सातारा यांनी बोडारवाडी धरणारबाबतीत आपली भुमिका स्पष्ट मांडली आहे . पेपरला गडबडीत बातम्या केल्याने संभ्रमावस्था झाली आहे.

धरण बांधण्याकरिता विभागातील जेष्ठ नागरीकांनी जी समिती गठित केली आहे. त्यांचेकडून धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता प्रयत्न राहणार आहे. बोडारवाडीचा प्रश्न कसा सुटेल याबाबतीत सहकार्याची भूमिका आहे. मुंबई पासुन गावापर्यत लोकांशी संपर्क करणार आहे. कोणी राजकीय पोळी भाजतय, कोण उसन आसवान आणून खोटा कळवळा आणतय यांचा बुरखा पाडणार आहे.

यावेळी माजी जिल्हापरीषद उपाध्यंक्ष वसंतराव मानकुमरे , जेष्ठ नेते तुकाराम धनावडे , हरीभाऊ सपकाळ, सागर धनावडे , सचिन पार्टे , राजुशेठ धनावडे , जयदिप शिंदे , समिर आकार , नाना जाभळे , विकास ओबळे , नगराध्यक्ष पांडुरंग जवळ , मालोजीराव शिंदे , जावली बॅक चेअरमन राजुशेठ ओबळे याच्यासह नागरीक उपस्थित होते .

आणखी संबंधित बातम्या

"माझ्या प्रॉपर्टीत कोणी पाय ठेवायचा नाही..."; बाजार समितीच्या भूमीपूजनावरून उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने

2023-06-21 12:21:18

"माझ्या प्रॉपर्टीत कोणी पाय ठेवायचा नाही..."; बाजार समितीच्या भूमीपूजनावरून उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने

राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर; कपिल सिब्बल यांचा आरोप

2023-03-24 19:39:37

राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर; कपिल सिब्बल यांचा आरोप

'दबावतंत्र असताना देखील राजणेंच्या पाठीशी का ?' शिवेंद्रराजे यांचा गौप्यस्पोट

2022-01-02 12:36:33

'दबावतंत्र असताना देखील राजणेंच्या पाठीशी का ?' शिवेंद्रराजे यांचा गौप्यस्पोट

राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय - नवाब मलिक

2021-09-30 16:17:11

राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय - नवाब मलिक