“सरकारविरोधात बोललो, तर ED, CBI आणि…”; जावेद अख्तरांनी पुन्हा एकदा व्यक्त केले परखड मत

Javed Akhtar | बॉलिवूडचे ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर विविध विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसतात. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटींसंदर्भात भाष्य केले आहे. बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्पष्ट शब्दांत दिले. त्यांच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जावेद अख्तर यांना एका मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी, आजकाल अमेरिकेतल मेरिल स्ट्रीप्स यांच्यासारखे कलाकार तेथील सरकारविरोधात आवाज उठवतात, पण इथले कलाकार गप्प का आहेत? असे विचारले. त्यावर अख्तर यांनी एक खोचक प्रतिप्रश्न करत, ‘तुम्हाला खरंच उत्तर जाणून घ्यायचंय?’.
पुढे उत्तर देत ते म्हणाले, ‘कसं आहे, या मंडळीचं नाव मोठं आहे. मात्र त्यांचा आर्थिक स्तर इतका नाही ही वस्तूस्थिती आहे. संपूर्ण कलाविश्वाला एक मध्यमवर्गीय उद्योगपती खिशात ठेवू शकतो. जो मोठा माणूस आहे, ज्याच्याकडे पैसे आहे त्यांच्यातलं कोण बोलतं? आहे का कोणी जो बोलला असेल? कोणीच नाही.’
यावेळी मेरिल स्ट्रीप या हॉलिवूड अभिनेत्रीचं उदाहरण देत त्यांनी ऑस्करच्या व्यासपीठावर स्पष्ट वक्तव्य करूनही त्यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली नाही याची आठवण करून दिली. त्यामुळे भारतीय कलाकारांमध्ये असणारी ही असुक्षिततेची भावना खरी आहे की खोटी याच विवंचनेत आपण पडलो आहोत, असं अख्तर म्हणाले. Javed Akhtar |
मुळात ही शक्यता असू शकते. कारण, लोकांना वाटतं की, जर आपण सरकारविरोधात बोललो, तर ED, CBI आणि Income Tax आपल्या मागे लागतील आणि आपल्या फाईल्स उघड होतील. ही समस्या फक्त चित्रपटसृष्टीतील लोकांची नाही, तर बाहेरच्या लोकांचीही आहे,” असे जावेद अख्तर म्हणाले. Javed Akhtar |
दरम्यान, जावेद अख्तर आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा त्यांनी परखड भाष्य केल्याने त्यांच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा:





