‘सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याला जोरदार टपली मारली कारण…’ नाना पाटेकरांनी माफी मागत सांगितला संपूर्ण किस्सा

Nana Patekar – बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चित्रपटांमधून लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यांचे जुने चित्रपट आणि त्यांच्या चित्रपटातील संवाद आजही लोकांच्या ओठावर आहे. मात्र, नाना पाटेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये नाना एका चाहत्याच्या डोक्यावर टपली मारतांना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नाना यांना ट्रोल केले जात आहे.
The video which is circulating on social media has been misinterpreted by many. What actually happened was a misunderstanding during the rehearsal of a shot from my upcoming film ‘Journey’. pic.twitter.com/UwNClACGVG
— Nana Patekar (@nanagpatekar) November 15, 2023
एका चाहत्याने नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, ते चाहत्यांच्या डोक्यावर टपली मारतांना दिसत आहे. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने चाहत्याला पकडून तेथून दूर नेले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आझाद अधिकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ ठाकूर यांनी नाना पाटेकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे नाना पाटेकर यांनी व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे.
वाराणसी में फिल्म शूटिंग के दौरान सेल्फी लेने पहुंचे फैंस को नाना पाटेकर ने थप्पड़ मारा…
#Varanasi #NanaPatekar #NanaPatekarSlapsFan pic.twitter.com/w5aRxPnA8C
— Sezal Chand Thakur (@imSCthakur) November 16, 2023
नाना पाटेकर यांच्या व्हिडिओनुसार, त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि त्यांना एक सीन शूट करायचा होता ज्यामध्ये एक मुलगा मागून येतो आणि यावेळी त्या व्यक्तीला ते मारणार असतात. या शूटदरम्यानच नाना यांनी चाहत्याला ती व्यक्ती समजत टपली मारली असे त्यांनी सांगितले. रिहर्सल करतांना नाना यांना तो चाहता शूटिंग टीम मेंबर वाटला. जेव्हा चाहता मागून सेल्फी घेण्यासाठी आला तेव्हा नाना यांना वाटले की तो त्याच्या टीमचा मुलगा आहे, म्हणून शूटदरम्यान सीननुसार नाना यांनी त्यांच्या डोक्यावर टपली मारली.
नानांनी व्हिडीओमध्ये असेही म्हटले आहे की, ‘मी कधीही कोणाला फोटोसाठी नाही म्हटले नाही. ही चूक झाली, हा चाहता कुठून आला ते कळत नाही आणि काही गैरसमज झाला असेल तर माफी मागतो. लोक माझ्यावर प्रेम करतात, मी असे काही करणार नाही. तो चाहता माझ्या पुढे आला तर त्याची मी पुन्हा एकदा माफी मागणार. त्या दिवशी तो चाहता पळून गेला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संपूर्ण किस्सा सांगितला.





