Shatrughan Sinha : ‘ते’ दोन निर्णय चुकले नाहीतर…; शत्रुघ्न सिन्हा यांना आजही होतो पश्चाताप, नेमकं काय घडलं होतं?
Shatrughan Sinha : पुढे याच चित्रपटांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले आणि त्यांना सुपरस्टार बनवले.

Shatrughan Sinha : दमदार संवादफेक आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट दिले. मात्र करिअरच्या शिखरावर असताना घेतलेल्या दोन निर्णयांचा त्यांना आजही पश्चाताप होत असल्याची कबुली त्यांनी स्वतः एका मुलाखतीत दिली होती. त्याविषयी जाणून घेऊयात…
1969 च्या क्लासिक चित्रपटांच्या काळात ‘साजन’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत शत्रुघ्न सिन्हा यांना पदार्पण केलं. त्यानंतर त्यांना दोन अशा चित्रपटांची अॅाफर मिळाली होती, जे चित्रपट पुढे ब्लॅाकबस्टर ठरले. ते चित्रपट म्हणजे शोले आणि दिवार. या चित्रपटांत काम करण्याची शत्रुघ्न यांना अॅाफर मिळाली होती. मात्र, तारखांच्या अडचणींमुळे त्यांनी दोन्ही चित्रपटांत काम करण्यास नकार दिला. पुढे याच चित्रपटांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले आणि त्यांना सुपरस्टार बनवले.
एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले होते की, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘शोले’मधील अमिताभ बच्चन यांची भूमिका प्रथम त्यांना ऑफर केली होती. मात्र त्या काळात त्यांच्या हातात अनेक चित्रपट असल्याने तारखांचे नियोजन जुळून आले नाही. त्यामुळे त्यांनी या चित्रपटांना नकार कळवला.
हेही वाचा : Pranit More: ‘370 रुपये बिर्याणी’ प्रकरणाच्या वाढत्या वादानंतर प्रणित मोरेने घेतला मोठा निर्णय; थेट…
शत्रुघ्न सिन्हा खंत व्यक्त करत म्हणाले होते की, “मला ‘शोले’ करायला हवा होता.” मात्र त्याचवेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, या चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय आयकॉन बनवल्याचे म्हटले होते.
इतकेच नाही तर ‘दीवार’ चित्रपटाची ऑफरही त्यांच्याकडे आली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांनी तोही चित्रपटही स्वीकारला नाही. नंतर हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला आणि त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख त्यांना मिळाली.
या दोन्ही चित्रपटांना नकार देणे ही आपली चूक होती, असे मान्य करत शत्रुघ्न सिन्हा असं सांगितलं होतं. आजपर्यंत त्यांनी ‘शोले’ आणि ‘दीवार’ हे दोन्ही चित्रपट पूर्णपणे पाहिलेले नाहीत. कारण हे चित्रपट नाकारल्याची खंत आणि पश्चाताप त्यांना आजही सतावत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा : Alpha Movie: आलियाची फी ऐकून व्हाल थक्क! ‘अल्फा’साठी घेतले ‘इतके’ कोटी रुपये






