Sanjay Gaikwad : भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजप देवाभाऊमय तर आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे १०० टक्के खोटं आहे. शिवसेना हा पक्ष ध्येय धोरणावर चालतो. लोढा यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही, असे संजय गायकवाड म्हणाले. नेमकं काय होते मंत्री मंगलप्रभात लोढा? आपण देवाभाऊंची विविध रुपं पाहतोय. त्यांची 100 वेगवेगळी रुपं आहेत. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. भाजप देवाभाऊमय तर आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील, हे देखील देवाभाऊच ठरवतात. मी गेल्या 25 वर्षांपासून त्यांना बघतोय. राजकारण करण्याचे काम त्यांना कधी आवडतं तर कधी नाही. मात्र, आपल्या कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्पर असतात आणि अडचणी आल्या तर धावून येतात संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो. आम्ही जी क्रांती केली त्यामुळे भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे. लोढा यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. मुंबई महापौरबाबतही वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजपच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मुंबईच्या महापौरबाबतही भाष्य केले होते. मुंबई हे आपलं घर आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर फक्त अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नाही. ती जबाबदारी आपलीही आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास आपली कॉलरही टाईट होईल, असे वक्तव्य मुंबई महापालिका महापौरबाबत लोढा यांनी केले होते. त्यांच्या या वक्त्यावार आमदार संजय गायकवाड यांनी मत व्यक्त केले आहे. आमदार संजय गायकवाड यांचा मोठा दावा मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला. याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील. जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करु असा मोठा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमधील भाजप-शिवसेना यांच्यात मुंबई महापौराबाबात दावा केला जात असून, यावरून संघर्ष निर्माण होऊन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. …म्हणून मोठा निर्णय आगामी काळात महापालिका निवडणुका लागणार असून, भाजपने मुंबई महापालिकासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने भाजप वाटचाल करीत आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. मित्रपक्षतील बड्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना थेट भाजपमध्ये पक्ष प्रवेश देण्यात आले. शिवसेनेतील मोठ्या प्रमाणावर नेत्यांना आपलेसे करण्यात भाजपला यश आले. त्यामुळे शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थेचे वारे वाहत असून, याबाबत काल एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर थेट प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हेही वाचा : Samantha Ruth Prabhu: लग्नानंतर केवळ चार दिवसांत समंथा पुन्हा कामावर हजर; हातावरची मेहंदी अद्याप ताजी