तुळजापूर – आम्हाला गृहित धरू नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. या मोर्चात खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. अशोक चव्हाण यांच्या घरासमोर येत्या 15 तारखेला आंदोलन करणार असल्याची घोषणाही यावेळी संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच आम्ही भीक मागत नाहीत तर आमचा हक्क मागत आहोत असेही संभाजीराजे म्हणाले.