पंतप्रधान पदाची जबाबदारी आली तर ती पार पाडू – राहुल गांधी

नवी दिल्ली –  सध्यातरी महाआघाडीच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. मात्र काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे.राहुल गांधी हे भविष्यातील पंतप्रधान असतील, अशीही चर्चा सध्या सुरु झाली आहे. त्यामुळे देशाचा पुढील पंतप्रधान कोण असणार, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला, यावर राहुल गांधी यांनी सूचक भाष्य केले आहे. देशाचा पुढील पंतप्रधान हा जनताच ठरवेल, असे राहुल गांधी म्हणाले. मात्र, पंतप्रधान पदाची जबाबदारी आली तर ती पार पाडू, असे संकेतही त्यांनी यावेळी दिलेत.

भाजपकडून पंतप्रधानपद म्हणून नरेंद्र मोदींचे नाव पुन्हा एकदा पुढे केले आहे. मात्र भविष्यात संधी मिळाली तर पंतप्रधान होण्यासाठी तयार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहे. दक्षिण भारतातल्या जनतेसोबत काँग्रेस असल्याचा संदेश देण्यासाठीच वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.