Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये चिंतन शिबिर पार पडलं. या शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. पक्षापेक्षा मंत्री महोदयांना जर इतर महत्त्वाची कामे अधिक असतील तर ते मंत्रीपद आपण मोकळे करूया आणि ते पद दुसऱ्या कुणाला तरी देऊया. म्हणजे त्यांना कळेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यांनी या विधानातून मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. पक्षाचे काही पालकमंत्री केवळ शासकीय कार्यक्रमांनाच उपस्थिती लावतात. ज्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, तिथे जाताना जिल्हाध्यक्षांकडे बघतही नाहीत, दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही देत नाहीत. यापुढे हे सर्व प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा कठोर शब्दांत अजित पवार यांनी मंत्र्यांना सुनावलं आहे. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी कोणत्याही मंत्र्यांचे नाव घेतले नाही. या शिबिरातून विदर्भ हा कुठल्या एका पक्षाचा बालेकिल्ला नाही, अशी भूमिकाही अजित पवारांनी मांडली. मंत्री, संपर्कमंत्री यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये जावेच लागेल. पक्ष तुम्हाला वर्षातून एक दिवस मागतो. तोसुद्धा तुम्हाला देता येत नसेल, तर हे बरोबर नाही, अशी खंत अजित पवारांनी बोलताना व्यक्त केली. तुम्हाला नेमून दिलेले जिल्हे व तालुक्यांमध्ये जावेच लागेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच पालकमंत्र्यांनी तेथील आमदार जिल्हाअध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी, लोकांमध्ये फिरावे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, असंही आवाहन केलं आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर विदर्भात संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं. ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष संघटना विदर्भात हवी तशी मजबूत नाही. मात्र, संघटनेला बळकट करायचे असेल तर सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. हेही वाचा : पडळकरांनंतर शिंदेंच्या या शिलेदारानेही ओलांडली मर्यादा; संजय राऊतांवर टीका करताना जीभ घसरली थेट म्हणाले…