Survey : Lok Sabha Elections | मागील वर्षी लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि एनडीएतील घटक पक्षांच्या साथीने भाजप सत्तेत आला. या निकालात भाजपाला 239 जागांवरच समाधान मानावं लागलं. यातच आता देशात आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल? हे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्ष संपूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करू शकतो, असे समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार, आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला देशात 281 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 78 जागांवर समाधान मानावं लागेल. तर इतर पक्षांना 184 जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या. मात्र या सर्वेक्षणानुसार आता काँग्रेस कमी जागा मिळतील असे समोर आले आहे. हे सर्वेक्षण इंडिया टुडे-CVoter ने (मूड ऑफ द नेशन (MOTN)) केले आहे. सर्वेक्षणाचा कालावधी 2 जानेवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 असा आहे. सर्वेक्षण 11 राष्ट्रीय भाषांमधून केले यात भारतातील सर्वच्या सर्व 543 लोकसभा मतदारसंघांमधील 54,418 लोकांसोबत चर्चा करण्यात आली. याशिवाय सी-व्होटरने गेल्या 24 आठवड्यादरम्यान 70,705 लोकांचे मतही जाणून घेतले. हे सर्वेक्षण CATI (कॉम्प्युटर असिस्टेड टेलिफोन इंटरव्ह्यूइंग) पद्धतीने करण्यात आले. यात देशभरातील लोकांना रँडम डायलिंग (RDD) तंत्राचा वापर करून प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात सर्व टेलीकॉम सर्कल्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण 11 राष्ट्रीय भाषांमधून करण्यात आले आहे. Survey : Lok Sabha Elections | कुणाला किती मते आणि जागा मिळतील? आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला 40.7 टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला 20.5 आणि इतरांना 38.5 टक्के मते मिळू शकतील. तर, एनडीएला 343 जागा, इंडिया ब्लॉकला 188 तर इतरांना 12 जागा मिळतील. पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? इंडिया टुडे, सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार पंतप्रधान म्हणून 51 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर 24.9 टक्के लोकांना राहुल गांधींना आणि 1.2 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्र, दिल्लीत भाजपची उत्तम कामगिरी अलीकडेच हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तम कामगिरी केली. महाराष्ट्रात महायुतीला 237 जागा मिळाल्या. तर दिल्लीतही भाजपाने 7 पैकी 48 जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. हेही वाचा: ना सतेज पाटील, ना अमित देशमुख… काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव आघाडीवर? लवकरच होणार मोठा फेरबदल